पोलिसांनी वेळीच धाव घेतली : हिंगोलीत भाजप कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न.घटनास्थळी पोलिस दाखल

पुणे दिनांक ३१ऑक्टोबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) बीड जिल्ह्यात व शहरात मराठा समाजाच्या तरुणांनी आक्रमक होत काल संपूर्ण दिवस आंदोलन सुरू करून आमदार प्रकाश सोळंके यांचे घर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे 🏠 घर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय जाळण्यात आल्या नंतर जाळपोळीचे लोण हिंगोली येथे दाखल झाले.
दरम्यान काल हिंगोली येथे रात्रीच्या सुमारास भाजपचे कार्यलय पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.दरम्यान हिंगोली शहर येथील कृषी अधीक्षक कार्यालयासमोर समोर असलेल्या भाजप कार्यालयाला अज्ञात व्यक्तींकडून पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.परंतु.याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले व मोठा अनर्थ टळला आहे.दरम्यान याप्रकरणी 🔥 आग कोणी लावली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी कार्यालयाला लागलेली आग आटोक्यात आणली.आता याठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.