धक्कादायक व्हिडिओ आला समोर : वंदेभारतच्या रेल्वे ट्रॅकवर मोठे दगड ठेवून घातपाताचा प्रयत्न

पुणे दिनांक २ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) उदयपूर - जयपूर वंदेभारत एक्सप्रेसच्या चालकांमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.व अनेक रेल्वे प्रवाशांचे प्राण वाचले आहेत ट्रेनच्या मार्गावरील भीलवाडाजवळ रेल्वे ट्रॅकवर अज्ञात व्यक्तीने दगड व लोखंडी रॉड रचले होते.व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये ट्रेनचा पायलट व सहाय्यक पायलट हे दोघेजण खाली उतरून रेल्वे ट्रॅक वरील दगड व लोखंडी रॉड काढत असतांना दिसत आहे.याच बरोबर रेल्वे रूळाच्या खाली टाकणाऱ्या सिमेंटच्या स्लीपरला असणाऱ्या लोखंडी कड्या दिसत आहे.यात रेल्वे अशीच धावली असती तर मोठी दुर्घटना घडली असती मात्र रेल्वे पायलटच्या सतर्कतेने अनेकाचे प्राण वाचले आहेत.परंतू चालकांने एमर्जन्सी ब्रेक लावल्याने मोठा होण्यापासून वाचवलं आहे.
दरम्यान २४ सप्टेंबर पासून उदयपूर - जयपूर वंदेभारत स्पेशल ट्रेनला उदयपूर येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता.ही ट्रेन उदयपूर पासून पाच जिल्ह्यांतून जाते.व राणाप्रताप स्थानकावर थांबते.या पूर्वी ओडिसा मध्ये कोरोमंडल एक्स्प्रेसला भीषण अपघात झाला होता.व या अपघातात २७५ पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला होता.व १हजार १०० प्रवासी जखमी झाले होते.व रेल्वे अपघाता नंतर संपूर्ण देश हादरला होता.व रेल्वेचा सर्वात मोठा अपघात झाला होता.पण यावेळी वंदेभारतच्या पायलट व सहाय्यक पायलट मुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.