ऑनलाइन जुगार जाहिरात : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन करणारे बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात

पुणे दिनांक ३१ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री व आमदार बच्चू कडू यांनी आज सकाळी कार्यकर्ते यांच्या सह क्रिकेट 🏏 पटू सचिन तेंडुलकर यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन केले.यावेळी आंदोलन अधिक तीव्र झाल्यानं पोलिसांनी बच्चू कडू व कार्यकर्त्यांना बांद्रा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.कार्यकर्ते पोलिस स्टेशन बाहेर आंदोलन करत आहेत.सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन जुगारची जाहीरात केल्या बाबतीत हे आंदोलन करण्यात आले आहे.
दरम्यान भारतरत्न असलेल्या व्यक्तीिने ऑनलाइन गेमची जाहिरात केल्यानं तरुणांमध्ये चुकीचा संदेश देऊ नये म्हणून अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.या संदर्भात त्यांनी १५ दिवसांचा कालावधी देखील सचिन तेंडुलकर यांना दिला होता.याबाबत तेंडुलकर यांच्या कडून काहीही प्रतिसाद न मिळाल्याने.त्यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन सुरू केले होते.यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी तेंडुलकर यांनी या ऑनलाइन जुगारची जाहीरात करू नये ते भारतरत्न पुरस्कार घेतलेले खेळाडू आहेत . त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जात आहे.त्यामुळे त्यांनी एकतर ही जुगाराची ऑनलाइन जाहिरात सोडावी नाही तर भारतरत्न सोडावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान या पूर्वीच आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील याबाबत पत्र पाठवले होते.मात्र पत्र देऊन देखील कोणत्याही कारवाई झाली नाही.या ऑनलाइन जुगारच्या जाहिरातीला महाराष्ट्रातील जनता बळी पडत आहे.व अनेकांचे संसार उद्धवस्त होत आहे.व कौटुंबिक आयुष्य देखील उध्वस्त होत आहे.अशा अनेक तक्रारी आपल्या कडे आल्या आहेत.असे ते यावेळी ते बोलत होते.सचिन तेंडुलकर यांनी ही ऑनलाइन जुगाराची जाहिरात बंद नाही केली तर पून्हआ आंदोलन केले जाईल असे त्यांनी यावेळी म्हणाले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.