अहवाल तयार करण्याचे हालचाली जोरात सुरू : मागासवर्गीय आयोगाकडून युद्ध पातळीवर काम सुरू.मराठा समाजाला ओबीसीतूनआरक्षण मिळणार ,

पुणे दिनांक ५नोव्हेबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला फक्त २४ डिसेंबर पर्यंत डेडलाईन दिल्यानंतर राज्यातील राज्यकर्ते व प्रशासन आता चांगलेच ऑक्शन मोडवर आले आहेत.संपूर्ण महाराष्ट्रात आता आयोगाचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे.व संपूर्ण महाराष्ट्रात कुणबी प्रमाणपत्र शोधमोहीमचे काम रात्रंदिवस काम सुरू आहे.मागसवर्गीय आयोग देखील चांगल्याप्रकारे काम करीत आहे.व लवकरा लवकर अहवाल तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.
दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाच्या कुणबी नोंदणी शोधण्यासाठी महाराष्ट्रातील संपूर्ण विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी हे आता रात्रंदिवस काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे.तसेच राज्य सरकारच्या वतीने नेमण्यात आलेल्या शिंदे आयोगाचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे.तसेच मागासवर्गीय आयोगाकडून देखील काम सुरू केले आहे .हा आयोग मराठा समाज हा मागास आहे की नाही? व कसा मागासलेला आहे.मराठा समाज हा पिढीजात शेती करतो व त्यांचे संपूर्ण कुटुंब हे शेतीवरच अवलंबून आहे.व तो पिढीजात शेतकरी आहे. त्यामुळे तो कुणबी आहे.आणी तो कुणबी असल्याने त्याला ओबीसी मधूनच आरक्षणासाठी तो पात्र आहे.दरम्यान या मराठा समाजाला मागासवर्गीय आयोगाकडून सकारात्मक अहवाल तयार करावा अशी अनेकांनी ईच्छा व्यक्त केली आहे.दरम्यान यापूर्वी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द करताना नोंदवलेल्या निरीक्षणांचा देखील अभ्यास निवृत्त न्यायमूर्ती करत आहे. याकरिता नामंांकित इन्स्टिट्यूटद्वारे मराठा समाजाचं सर्वेक्षण करुन इम्पेरिकल तयार करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान काहीही असलेतरी कोणत्याही समाजाला आरक्षण द्यायचे असेलतर त्या समाजाला प्रथम मागस घोषित करणं इथं आवश्यक आहे.त्यादुष्टीने आता सर्व काम आयोगाच्या वतीने युद्ध पातळीवर काम सुरू झाले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.