सीबीआय तपास प्रकरणात : खंडणी प्रकरणात जेलमध्ये असलेल्या सचिन वाझेला जामीन मंजूर

पुणे दिनांक २९ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) खंडणी प्रकरणात जेलमध्ये असलेल्या सचिन वाझेला जामीन मंजूर झाला आहे.दरम्यान सीबीआय तपास करत असलेल्या प्रकरणात हा जामीन मंजूर झाला आहे.मागील आठवड्यात मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझेला जामीन अर्ज एनआयए न्यायालयाने फेटाळून लावला होता.आज त्याला सीबीआयच्या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे.असे ' एबीपी माझा ' ने हे वृत्त दिले आहे.
दरम्यान दोन वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या अॅटेलिया प्रकरण खुपच गुंतागुंतीची झाले होतं.२५ फेब्रुवारी २०२१ रोजी २०२१ रोजी मुकेश अंबानी यांच्या अॅटेलिया या 🏠 घरा बाहेर एक महिंद्र स्कार्पिओ आढळली होती.त्यात तब्बल २० जिलेटनच्या कांड्या असलेली बॅग आढळून आली होती.त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती.या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ५ मार्च रोजी मुंब्रा येथील खाडीत सापडला होता.व या प्रकरणीचे सर्व धागे दोरे सचिन वाझे यांच्या प्रर्यत आले .या प्रकरणी सचिन वाझेवर कथीत १०० कोटी रुपयांच्या खंडणीची केस देखील सुरू आहे.सीबीआय तपास करीत असलेल्या प्रकरणा मध्ये.आज वाझेला जामीन अर्ज मंजूर झाला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.