Crime : पी सी बी गुन्हे शाखापुणे शहर अंतर्गत एम.पी डी ए कायद्या न्वये चतुःश्रुंगी येथील भाईची नागपूर कारागृहात रवानगी

पुणे दिनांक १४.( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) चतुःश्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भाईगिरी करणारा अट्टल गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार यांनी एम पी ए डी ए .कायद्या न्वये स्थानबध्देची कारवाई करत त्यांची रवानगी नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात केलीआहे. आयुक्त रितेश कुमार यांची ही ३० वी स्थानबध्देतेची कारवाई आहे.
नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी झालेल्या भाईचे नाव औदुंबर उर्फ मोन्या रविंद्र नाकते ( वय २७.राहणार घर .नबंर १०७१ \ ११३. जनवडी गोखले नगर पुणे) असे आहे. हा पुणे पोलीस यांच्या रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून याने त्याच्या अन्य साथीदारा सह चतुःश्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत धारदार शस्त्रे. लोखंडी गज .अग्नी शस्त्रा द्वारे दुखापत करणे. खुनाचा पर्यंत्न. जबरी चोरी. दंगा करणे. दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याच्या विरोधात मागील पाच वर्षांच्या कालखंडात याच्या वर एकूण आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान याच्या मुळे या परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्यांच्या पसून जीवीतेचे व मालमत्तेचे नुकसान होइल या भितीने या भागातील नागरिक उघड पणे त्याच्या विरोधात तक्रार दाखल करत नव्हते. त्या मुळे त्याच्या विरोधात प्राप्त प्रस्ताव सह कागदपत्रे पडताळून पोलीस आयुक्त पुणे रितेश कुमार यांनी एम पी डी ए कायद्या न्वये नागपूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षा करिता स्थानबध्द करण्याचे आदेश दिले आहेत. या बाबत चतुःश्रुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पाढंरे व पी सी बी गुन्हे शाखा पुणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी कामगिरी पार पाडली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे व सक्रिय. अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबले आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची ही ३० वी स्थानबध्देतेची कारवाई आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.