Crime : खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भाईला एम. पी डी ए.कायद्या अंतर्गत एक वर्षा करिता केले स्थानबध्द

पुणे दिनांक ६ जुलै ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम ) खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भाईगिरी करणारा भाई अरबाज उर्फ बबन इकब्बाल शेख ( वय २४.राहणार ३८६.भवानी पेठ ओवेरा कन्स्टक्शन चुडामन तालीम समोर पुणे ) याला एक वर्षा करिता नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द केले आहे. यांच्या विरोधात खूनाचा प्रयत्न.खंडणी. जबरी चोरी. विनयभंग. दंगा. बेकायदेशीर हत्यार बाळगने. असे त्याच्या विरोधात एकूण ११.गुन्हे दाखल करण्यात आला आहेत.
याने त्याच्या अन्य साथीदारा मार्फत खडक पोलीस स्टेशन समर्थ पोलीस स्टेशन.लष्कर पोलीस स्टेशन.च्या हद्दीत गुन्हे केले असून तो या तिन्ही पोलीस स्टेशनच्या रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून याच्या विरोधात खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल माने. व पी. सी. बी. गुन्हे शाखा पुणे शहर च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली चांदगुडे यांनी कामगिरी पार पाडली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी यांनी प्रस्तावाची व कागदपत्रांची पडताळणी करून शेख याला एक वर्षा करिता एम. पी. डी.ए कायद्याकायद्या न्वये स्थानबध्द केले आहे. आयुक्त रितेश कुमार यांची ही एम.पी.डी.ए.ची २४.वी कारवाई आहे. सराईत व अट्टल गुन्हेगारांवर या पुढे देखील प्रभावी व प्रति बंधक कारवाई करण्यात येणार आहे. असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.