भीषण अपघातात २५ प्रवासी जखमी ८ जणांची प्रकृती चिंताजनक : वडूज ते खटाव रोडवर भरघाव एसटी बसने दुचाकीस्वाराला उडवलं दुचाकी स्वर जागेवर ठार बस झाडाला धडकली २५ प्रवासी जखमी

पुणे दिनांक ८ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) सातारा जिल्ह्यातील वडूज ते खटाव रोडवर भीषण अपघात झाला असून भरघाव वेगाने जाणाऱ्या एसटी बसने एका दुचाकी स्वराला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार घटना स्थळीच ठार झाला आहे.अपघाता नंतर एसटी बस रोडच्या कडेला असलेल्या 🌲 झाडावर जाऊन जोरात आदळून झालेल्या अपघाता मुळे एसटी बस मधील एकूण २५ प्रवासी हे गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यातील ८ प्रवासी यांची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान या अपघात प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नुसार एसटी बस हि वडूज ते खटाव रोडवरुन भरघाव वेगाने जात असताना जाधव वस्ती नजीक जाणाऱ्या दुचाकी स्वार याला पाठी मागून धडक दिल्याने तो घटनास्थळीच ठार झाला तर एसटी बस ही रोड सोडून रोडच्या कडेला असलेल्या 🌲 झाडावर जाऊन जोरात आदळली यात एसटी बसचे समोरील कॅबीनचा चक्काचूर झाला आहे. यातून समजते की बस खूप भरघाव वेगाने जात होती.या बस मधील २५ प्रवासी हे गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना स्थानिक नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दखल केले आहे.यातील ८ जखमी प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. आता पुढील उपचारासाठी सातारा येथे हलविण्यासाठी प्रय्त्न सुरू आहे.या अपघातात एसटी बसच्या चालकाच्या हलगर्जीपणा मुळे झाल्याचे बोलले जात आहे.या अपघात प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.