सिग्नल जवळ अपघात अनेक वाहने एकमेकांवर आदळली : पुण्यातील सिंहगड रोडवरील नवले पुलाजवळ भरघाव ट्रकने मारुती आर्टीकला दिली टक्कर भीषण अपघातात एकाचा मृत्यू

पुणे दिनांक २५ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे शहरातील सिंहगड रोडवरील नवले पुलाजवळ एक विचीत्र असा अपघात झाला असून येथील सिग्नला उभी असणाऱ्या मारुती आर्टीकला भरघाव वेगाने येणाऱ्या ट्रकने पाठीमागून जोरात धडक दिल्याने अनेक वाहने एकमेकांवर जोरात आदळली दरम्यान या भीषण झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार. कात्रज चौक येथून भरघाव वेगाने येणाऱ्या सिमेंटचा ट्रक नंबर के ए.५६ / ३१६५ ने पाठीमागून मारुती सुझुकी आर्टिका एम एच १२ जे.यु.३५६५ ला पाठीमागून जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.यात या ट्रकने दिलेल्या धडकेत अनेक वाहने ही एकामेकांवर आदळली आहेत तर यात काही दुचाकींना देखील उडविले आहे.हा अपघात दुपारी झाला असून यात दुचाकीस्वार संदेश बानदा खेडेकर याचा मृत्यू झाला आहे. यातील अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघाता नंतर मोठ्या स्वरूपात वाहतूक कोंडी झाली आहे. पोलिसांनी अपघात ग्रस्त वाहनं एका साइडला करुन वाहतूक कोंडी सोडविली आहे.अपघाता सिंहगड वाहतूक शाखेचे पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन यातील जखमींना तातडीने उपचार साठी रुग्णांलयात दाखल केले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.