Crime : पुणे शहरात गुन्हा करून उत्तर प्रदेशकडे पळून जाण्याचा तयारीत असणां-या गुन्हेगारांच्या भारती विध्यापीठ पोलीसांनी आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक २० ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) भारती विध्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत कात्रज संतोष नगर गगनगिरी शाळे जवळ येथे एकास लोखंडी हत्याराच्या सहाय्याने मारून गंभीररित्या जखमी केले होते .या बाबत आरोपीच्या विरोधात भारती पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी त्याच्या मुळगावी उत्तर प्रदेशला पळून जाण्याचा तयारीत आहे. अशी माहीती पोलीस यांना सूत्रांनच्या द्वारे मिळाल्या नंतर पोलीस यांनी त्याचा मुसक्या आवळल्या आहेत .
अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या नाव १ ) प्रदिप सिंग बुट्टे नारिया ( वय ३० राहणार केदारी नगर कोंढवा पुणे. मुळ रा.शहारी दाऊदपुर .जालौर .उत्तर प्रदेश) असे आहे. या घटने बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार. यांने कात्रज संतोष नगर गगनगिरी शाळे जवळ येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून येथे मुलीस शिविगाळ करून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देउन फिर्यादी यांना ठार मारण्याच्या उद्देश्याने लोखंडी हत्याराच्या सहाय्याने मारून गंभीररित्या जखमी केले होते या बाबत भारती विध्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ३७ (१ ) ( ३ )सह १३५ अन्वये गुन्हा दाखल आहे.
दरम्यान नारिया हा मुळचा उत्तर प्रदेश मधील असून तो पळून जाण्याचा दाट शक्यता आहे. म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आरोपीचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. याच अंनुषंगाने पोलीस अंमलदार. हर्षल शिंदे. धनाजी धोत्रे.सचिन गाडे .हे केदारी नगर कोंढवा पुणे या भागात जाउन तपास करीत असतांनाच त्यांना माहिती मिळाली की आरोपी हा त्याच्या मुळगावी पळून जाण्याचा तयारीत आहे. पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे प्रविणकुमार पाटील. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-२ श्रीमती स्मार्तना पाटील. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे शहर नारायण शिरगावकर. यांच्या मार्गदर्शनाखाली भारती पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक. गिरीशकुमार दिघावकर .सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ .वर्षा तावडे.पोलीस अंमलदार हर्षल शिंदे .धनाजी धोत्रे. सचिन गाडे.शैलेश साठे.चेतन गोरे. निलेश ढमढेरे. मंगेश पवार. अभिजित जाधव. अवधुत जमदाडे.सचिन सरपाले.निलेश खैरमोडे .अभिनय चौधरी.अशिष गायकवाड. राहुल तांबे. विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.