पुण्यातील ड्रग्स प्रकरण : पुण्यातून ससून रुग्णालयातून फरार झालेल्या ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक १० ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील ससून रुग्णालयातून पोलिसांच्या समोर पळून गेलेला ड्रग्स तस्कर ललित पाटील याच्या भाऊ भूषण पाटील याच्या मुसक्या पुणे पोलिसांनी आवळल्या आहेत.दरम्यान काही महिन्यांपासून मुंबई.पुणे.नाशिक पोलिस ललित पाटील व भूषण पाटील याच्या मागावर होते मुंबई मधील साकीनाका पोलिसांनी ३०० कोटीचे ड्रग्स जप्त करुन तेथून १२ कामगारांना अटक केली होती.परंतू भूषण पाटील पळून जाण्यात यशस्वी झाला होता. पोलिसांनी उत्तर प्रदेश मधील वाराणसी येथून ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याला अटक केली आहे.
दरम्यान ड्रग्स माफिया ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पोलिस बंदोबस्त असतानाही पळून गेला होता.त्याचा भाऊ हा नाशिक येथे ड्रग्सचा कारखाना चालवायचा त्या कारखान्यांवर मुंबई पोलिसांनी छापेमारीत कारखान्यांवर छापेमारी करून काही कामगारांना अटक केली होती.परंतू नाशिक येथे ड्रग्सचा कारखाना असून हे नाशिक पोलिसांना याची कल्पना न्व्हती हे विषेश आहे.व याबद्दल सर्वत्र आश्र्चर्य व्यक्त केले जात आहे.दरम्यान यापूर्वी मुंबई पोलिसांनी नाशिक रोडवरील शिंदे एमआयडीसी मध्ये ड्रग्स प्ररकांणात छापा मारुन १५० किलो एमडी ड्रग्स ३०० कोटीचे पकडून एकूण १२ जणांना अटक करण्यात आली होती .परंतू येथून भूषण पाटील हा पळून गेला होता.त्याला आता पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.