Crime : पुणे पोलिसांची मोठी कारवाई झोमॅटो कंपनीच्या कर्मचा-यास लुटणा-या टोळी विरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई. पोलिस आयुक्तांची ही ४१ वी कारवाई

पुणे दिनांक २ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) पुण्यातील वाढती गुन्हेगारांवर पुणे पोलिसांनी चांगलीच कारवाईचा आता बडगा उगरला आहे. पुण्यात झोमॅटो कंपनीच्या डिलीव्हरी कर्मचारी याला शस्त्रांच्या धाक दाखवून लुटणां-या अट्टल गुन्हेगारांवर व विश्रांतवाडी परिसरात दहशत निर्माण करण्यां एकूण सहा गुन्हेगारांच्या आता पुणे पोलिसांनी मुसक्या आवळून त्यांच्या वर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. सदरची महाराष्ट्र संघटीत कायद्या अंतर्गतची आता पर्यंतची पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची हि ४१ वी कारवाई आहे.
दरम्यान ज्या आरोपीच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई केली त्यांची नावे १) विक्रांत उर्फ सरडा प्रकाश देवकुळे ( टोळी प्रमुख वय २०.रा.दुर्गामाता मंदिर लेन नं.१२ गणेश नगर बोपखेल पुणे) २) कुणाला उर्फ साहिल बाबु पेरूमलट ( वय २१) ३) रोहित शैलेश सदाकळे ( वय २१ रा. दोघे शांती नगर येरवडा पुणे) ४) गणेश बाबु बावधने ( वय २० रा.पडाळे वस्ती औंध रोड पुणे) ५) आदित्य भारती शेडगे ( वय २० रा.पिंपळे गुरव पुणे) ६) तेजस उर्फ बलमा अर्जुन गायकवाड ( वय २०रा.जुनी सांगवी पुणे) या प्रमाणे आहेत.
दरम्यान हे सर्व गेली ४ वर्षेन पसून विश्रांतवाडी परिसरात दहशत निर्माण करण्यांचा पर्यंत्न करणे तीन चाकी व दुचाकी गाड्यांची तोडफोड करणे. यांच्या वर एकूण ६ गुन्हे पोलिस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आले आहेत .तसेच यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई पोलिसांन कडून करण्यात आली आहे. पण त्यांचावर या कारवाईचा काहीच परिणाम झाला नाही. त्याच्या गुन्हेगारी कारवाई चालूच होत्या .अखेर त्याच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ च्या कायद्या अंतर्गत मोक्का ची कारवाई करण्यात आली आहे. या बाबतचा प्रस्ताव विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांनी उप - आयुक्त परिमंडळ ४ यांच्या मार्फत अप्पर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर रंजन कुमार शर्मा यांनी या बाबतचा अहवाल पोलिस आयुक्त यांना सादर केल्या नंतर आयुक्तांनी ही कारवाई केली आहे. पुणे पोलिस आयुक्त पुणे रितेश कुमार यांनी कार्यभार आपल्या ताब्यात घेतल्या पसून त्यांची ही ४१ वी कारवाई आहे. या प्रकरणी पुढील तपास सहा. पोलिस आयुक्त येरवडा विभाग संजय पाटील हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार व सहा.पोलिस आयुक्त संदीप कर्णिक. अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर रंजन कुमार शर्मा. पोलिस उप-आयुक्त परिमंडळ ४ शशिकांत बोराटे.सह.पोलिस आयुक्त खडकी विभाग श्रीमती आरती बनसोडे. यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रांतवाडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर .गुन्हे पोलिस निरीक्षक भालचंद्र ढवळे.सर्व्लन्स पथकातील पोलिस अंमलदार मनोज शिंदे. व सुनिल हसबे यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.