रविवारी मध्यरात्री झाला पिंपरी चिंचवड मध्ये स्फोट गॅस चोरीचे मोठे रॅकेट : गॅस टॅकरमधून गॅस चोरी करतांना नऊ सिंलेडर टाक्याचा मोठा स्फोट ... स्फोटानंतर भीषण आग 🔥 आगीत ४ ते ५ स्कूल बस जळाल्या दिवाळी आधीच मोठी दिवाळी

पुणे दिनांक ९ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पिंपरी चिंचवड मध्ये बेकायदेशीर रित्या गॅस टॅकरमधून गॅस चोरी करीत असताना अचानक पणे सिंलेडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकामागोमाग एक असा सिंलेडरचा टाक्याचा बार मध्यरात्री उडत होता दिवाळी आधीच मोठी दिवाळी या स्फोटामुळे झालेली या ठिकाणी बघायला मिळत होती स्फोट एवढे भयानक होते घरात झोपलेले नागरिक या स्फोटाच्या आवाजाने 🏢 इमारतीच्या बाहेर आले.यात ४ते ५ स्कूल बस या स्फोटामुळे जळून खाक झाल्या आहेत.
दरम्यान या घटनेबाबत बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड येथील जेएसपीएम महाविद्यालय जवळ ही घटना घडली आहे रविवारी रात्री ताथवडे भागात बेकायदेशीर पणे प्रोपिलीन गॅस हा घरगुती सिंलेडर व कमर्शियल सिंलेडर मध्ये गॅस भरण्याच्या काम सुरू होते.यात गॅसची गळती होऊन 🔥 आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.दरम्यान ही आग लागल्यानंतर ही चोरी करणारे भामटे पळून गेले.यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.दरम्यान या आगीत जेएसपीएम महाविद्यालय जवळ थांबलेल्या ४ ते ५ स्कूल बस पूर्णपणे या स्फोटात जळून खाक झाल्या आहेत.दरम्यान ही आग अग्निशमन दलाच्या जवानांनी आटोक्यात आणली आहे.व कुलिंगचे काम देखील संपले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.