Crime : ' एटीएस' ची पुण्यात मोठी कारवाई. जयपूर बाँबस्फोटातील आरोपींना पुण्यात ' आसरा ' दिल्या प्रकरणी आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक २७ (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) पुणे पोलिस यांनी रात्री गस्तीच्या वेळी शास्त्रीनगर भागात बीट मार्शल यांनी दोन संशयित आरोपी यांना अटक केली होती. या दोंघा दहशत वाद्यांना राहण्या साठी जागा देण्या-यां एकास दहशतवाद विरोधी पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुणे पोलिसांनी अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांनासाठी जागा देण्या-यां कोंढवा येथील एकास दहशतवाद विरोधी पथकाने ( ATS) अटक केली आहे. कादीर दस्तगीर पठण ( वय ३२ राहणार कोंढवा पुणे) असे आहे. पठाण हा कोंढवा भागात राहत होता व त्यांचा ग्राफिक्स डिझाईनचा व्यवसाय आहे.
कोथरूड पोलिसांच्या पथकाने मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खाण ( वय.२३.) मोहम्मद युसूफ मोहम्मद याकुब साकी यांना दुचाकी चोरीच्या संशायातून अटक करण्यात आली होती. नंतर त्याच्या घराची झडती घेतल्या नंतर त्यांचे दहशतवाद कनेक्शन पुढे आले .ते जयपूर येथील एका बाॅम्ब सोफ्टातील आरोपी आहेत वव एनआयएच्या रडारवर होते .
मोहम्मद खाण व मोहम्मद साकी हे जयपूर येथील एका बाँबस्फोटातील फरार आरोपी आहेत. त्यांच्यावर एनआयएने गुन्हा दाखल केल्यानंतर हे दोघे मार्च २०२२ मध्ये मुंबई मधील भेंडी बाजार येथून पळून आले होते .मुंबईत पकडले जाण्याच्या भीतीने ते दोघे दहशतवादी पुण्यात राहत होते.प्रथम ते पुण्यातील कौसर भागातील एका मशिदी मध्ये राहत होते. तेव्हा त्यांची ओळख अब्दुल कादीर दस्तगीर पठाण यांच्याशी झाली या दोंघा दहशतवादी यांनी आपण गरीब असून कामाच्या शोधात आलो असल्याचे सांगितले.
दरम्यान त्याने खान व साकी यांना ग्राफिक्स डिझाईनचे काम देत त्यांना महिना ८ हजार रूपये पगार दिला .तसेच अब्दुल पठण यांने चेतना गार्डनमधील अन्वर अली इद्रीस यांच्या मालकीची एक खोली या दहशतवाद्यांना राहयला दिली .या खोलीचे घरभाडे ३ हजार ५०० रूपये भाडे अब्दुल या दोंघा कडून घेत असत २७ जुलै रोजी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.