Bogus Certificates : नाशिक मधील शासकीय हॉस्पिटल मधून बोगस प्रमाणपत्र घेतले म्हणून तब्बल २१ पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल! पोलीसांनीच मोडला कायदा ?

नाशिक मधील जिल्हा आरोग्य रुग्णालयांमधून अंतर्गत अंतर बदलीसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र नाशिक ग्रामीण मधील पोलीस खात्यातील तब्बल २१ घेतल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांवर पोलीस खात्याचीच फसवणूक केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थोडक्यात काय तर पोलिसांनीच कायदा मोडल्याचे आता समोर आले आहे. पोलीस कारवाईच्या भीतीला घाबरून अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक दोघे डॉक्टर फरार झाले आहेत.
दरम्यान फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे. निलेश झगडे. राजू झाडे. मोहन उगले. बाळू सदगीर. नितीन सांगळे. अनिकेत हळदे. निलेश पाटील. राहुल क्षत्रिय. धनश्री देवरे. पवन अहिरे. सचिन विसपुते. अतुल चव्हाण अमोल बच्छाव. शकील शेख. सोनू दिंडे. किशोर दाते. दिपाली सानप. पूजा गायधनी. सुजाता गावकर. योगेश शिंदे. निकिता ठोंबरे. अशी आहेत
या सर्वांनी नाशिक जिल्हा रुग्णालयातून बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र हे मनाप्रमाणे बदली मिळण्याकरिता घेतले होते. आंतर जिल्हा बदली करिता देखील याचा उपयोग करण्यात आला होता व बदली करिता कुटुंबीयांना गंभीर आजाराची कारणे दाखविली होती व ते बनावट पत्र ग्रामीण पोलिसात दाखल केले होते. पण याबाबतचा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलीस दलाचा लिपिक हिरा कणेज. रुग्णालयाचा लिफ्ट मॅन कांतीलाल तसेच लिपिक पगारे व डॉक्टर निखिल सैदणे. व डॉक्टर किशोर श्रीवास. खासगी रुग्णालयाचे व्यवस्थापक यादव. वैद्यकीय अधिकारी धुळे या सर्वांची नावे निष्पन्न झाली. डॉक्टर सैदणे व डॉक्टर श्रीवास यांचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे ते दोघेजण पोलिसांच्या कारवाईला घाबरून फरार झाले आहेत. एकूण या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून. फरार झालेल्या दोघा डॉक्टरांच्या मागावर क्राईम ब्रँच पोलीस पथक रवाना केल्याचे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.