Bomb Threat : पुन्हा बॉम्बची धमकी! गोव्यात येणारे अझूर एअरलाइन्स वळवले

गोव्यात येणार्या अझूर एअरलाइन्सच्या रशियन चार्टर विमानाला पुन्हा एकदा बॉम्बची धमकी मिळाली आहे. सूत्रांनी सांगितले की, गोवा विमानतळ संचालकांना बॉम्बची धमकी देणारा मेल आला आहे.
त्यानंतर गोवा विमानतळाने अझूर एअरलाइन्सला ताबडतोब अलर्ट केले आणि 247 प्रवासी आणि 7 क्रू मेंबर्स असलेल्या रशियन चार्टर फ्लाइटला तात्काळ वळवण्यात आले आणि उझबेकिस्तानमधील विमानतळावर उतरवण्यात आले आहे.
दरम्यान, पहाटे 3.30 च्या सुमारास धमकीच्या कॉलनंतर दाबोळी विमानतळावर मोठा पोलीस बंदोबस्त, अग्निशमन दल आणि इतर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रशियन फ्लाइटच्या लँडिंगच्या पुढील तपशीलांची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, मॉस्कोहून दाबोळी विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असलेल्या रशियन चार्टर विमानात बॉम्ब असल्याची माहिती 9 जानेवारी रात्री उशिरा गोवा एअर ट्रॅफिक कंट्रोलला मिळाली होती. यानंतर 244 प्रवाशी असलेले हे विमान तातडीने जामनगर-गुजरात विमानतळाकडे वळवण्यात आले होते. तिथे रात्री 9.49 वाजता विमानाचे सुरक्षित लॅन्डिंग करण्यात आले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.