नाशिक येथे जप्त करण्यात आलेले ड्रग्सचा पुण्यातील ससून रुग्णालयातील प्ररकांणाशी आहे का तपास सुरू : नाशिक येथील एमआयडिसीमध्ये ड्रग्सच्या फॅक्टरीवर मुंबई पोलीसांचा छापा ३०० कोटींचे ड्रग्स जप्त.१२ जणांच्या आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक ६ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबई पोलीसांनी मोठी कारवाई करत ३०० कोटींचे ड्रग्स जप्त केले आहे.यात १५० किलो पेक्षा जास्त ड्रग्स यावेळी कारवाईत जप्त करण्यात आले आहे.नाशिक रोडवरील शिंदे गावातील एमआयडीसी मध्ये एमडी ड्रग्स फॅक्टरीवर मुंबई पोलिसांच्या वतीने छापेमारी केली आहे.दरम्यान नाशिक ड्रग्सचे पुण्यातील ससून रुग्णालयातील ड्रग्स कनेक्शन आहेत का? याचा देखील पोलिस मुंबई पोलीस करणार आहेत.
दरम्यान मुंबई पोलिसांनी नाशिक मधील ड्रग्स फाॅक्टरी वर कारवाई करुन या कारवाईत एकूण १२ जणांना अटक करण्यात आली आहे.सदरची ही ड्रग्सची फाॅक्टरी नाशिक रोडवरील शिंदे गावातील एमआयडीसी मध्ये एमडी ड्रग्सच्या फॅक्टरीवर मुंबई पोलिसांनी छापेमारीत करुन सुमारे दिडशे किलो पेक्षा जास्त ड्रग्स पोलिसांनी हस्तगत केले आहे.या ड्रग्सची मार्केट मध्ये किंमत ३०० कोटी रुपये आहे.दरम्यान याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वेगवेगळ्या भागातून बारा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.