बीडमध्ये एकच खळबळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल : बीआरएस पक्षाचे काम थांबवा नाही तर गोळ्या घालून संपवू पती पत्नीला निनावी पत्रा द्वारे धमकी

पुणे दिनांक २० सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील पती व पत्नी हे दोघेजण बीआरएस पक्षाचे काम करतात या दोंघा जणांना गोळ्या घालून त्यांची हत्या करु असे धमकीचे पत्र अज्ञात व्यक्तीने दिल्या मुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.या निनावी पत्रात ' बीआरएस काम ताबडतोब तुम्ही थांबवा, नाहीतर तुमचा दाभोळकर करु' अशी धमकी बीड जिल्ह्यातील गेवराई मध्ये राहणारे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व बीआरएस पक्षाचे पती व पत्नीला आली आहे.या निनावी पत्रा द्वारे धमकी देण्याच्या अज्ञात व्यक्तीने तक्रार दिली आहे.
दरम्यान बाळासाहेब म्हस्के व पत्नी मयुरी म्हस्के हे दोघे पती व पत्नी बीआरएस पक्षाचे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात काम करतात व तालुक्यात सर्वत्र मेळावे व शिबीर घेत आहेत.त्यामुळे धमकी देण्याऱ्या व्यक्तने तुम्ही आमच्या नेत्यांचे खच्चीकरण करतात म्हणून धमकी देण्यात आली आहे.या प्रकरणी म्हस्के यांनी गेवराई पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.या बाबत पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.