Crimes : पुणे येथील मंगला चित्रपटगृह बाहेर जुन्या वादातून एकाची तलवार व कोयत्याने हल्ला करून निर्घृण हत्या

पुणे दिनांक १६ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) शिवाजीनगर येथील मंगला चित्रपट गृहात गदर चित्रपट पाहून बाहेर आल्यावर जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका जणांचा दहा ते बारा जणांनी मिळून आज पहाटे एक वाजण्याच्या सुमारास तलवार व कोयत्याच्या सहाय्याने वार करून निर्घृण खून केला आहे.या हत्या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात आरोपींन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान शिवाजीनगर पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव नितीन म्हस्के असे आहे.नितीन यांचे . कोरेगाव पार्क मध्ये अज्ञात कारणांवरून भांडणं झाली होती. यातील एका आरोपींवर नितीन यांने वार केला होता त्या वेळेचा बदला म्हणून नितीन हा शिवाजीनगर येथील मंगला चित्रपट गृहात गदर चित्रपट पाहण्यासाठी गेला होता नंतर तो बाहेर आल्यावर बाहेर दबा धरुन बसलेल्या अज्ञात दहा ते बारा जणांनी मिळून पूर्ववैमनस्यातून तलवार व कोयत्याच्या सहाय्याने त्यांच्यावर सपासप वार करून त्यांची निर्घृणपणे हत्या केली आहे.ही घटना आज पहाटे एक वाजता घडली आहे.या हत्या प्रकरणी सतीश आनंद वानखेडे ( वय ३४ रा.ताडीवाला रोड झोपडपट्टी पुणे) यांने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीन विरुद्ध गुन्हा दाखल केला असून.पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करीत आहे.दरम्यान पुणे शहरात दिवसांन दिवस गुन्हेगारी मध्ये वाढ होताना दिसत आहे.या हत्या नंतर याभागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.