Brutal Murder : गळा कापून महिलेची निर्घृण हत्या

बेंगळुरू मध्ये मंगळवारी रात्री एका महिलेचा मृतदेह आढळला. राजाकुंटे येथील शानुभोगनाहल्ली गावात गळा चिरलेल्याअवस्थेत शेतात हा मृतदेह आढळून आला. ( एएनआय च्या वृत्तानुसार)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राशी (१९) असे मृत तरुणीचे नाव असून, ती येलहंका येथील एका खासगी महाविद्यालयात बीएच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव मधु चंद्रा असून तो मूळचा आंध्र प्रदेशचा आहे.
राशी कॉलेजमधून घरी जात असताना मधु चंद्राने तिच्यावर हल्ला केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मधु चंद्राचा राशीसोबत वाद झाला होता.
या कृत्यानंतर आरोपी फरार झाला. कथित हत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.
पुढील तपशीलाची प्रतीक्षा आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.
Find Bangalore News, Brutal Murder News, Bangalore Crime News, latest Bangalore marathi news and Headlines based from Bangalore City. Latest news belongs to Bangalore crime news, Bangalore politics news, Bangalore business news, Bangalore live news and more at Polkholnama.