Burning train : नाशिक रेल्वे स्थानकावर बर्निंग रेल्वे, हावडा मेलला लागली आग

नाशिक रोड रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वे गाडीच्या बोगीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. हावडा मेल एक्स्प्रेसच्या बोगीला आग लागली.स्टेशनवर गाडी थांबली असताना ही घटना घडली. तातडीने प्रवाशांना खाली उतरवण्यात आले आहे. आग विझवण्याचे काम सुरू आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर रेल्वेला आज सकाळी आग लागली.
मुंबईकडे येणाऱ्या हावडा मेलच्या बोगीत आग लागली.बोगीला आग लागल्यामुळे स्थानकावर धुराचे लोट पाहण्यास मिळत आहे. सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले आहे. या घटनेमुळे स्टेशन परिसरात गोंधळ उडाला आहे.घटनेची माहिती मिळताच नाशिक अग्निशमन दलाचे बंब रेल्वे स्थानकाकडे रवाना झाले आहे.
माहितीनुसार, हावडा मेल नाशिकरोड रेल्वे स्थानकात पोहचताच आग लागली. रेल्वेला आग लागल्याचे समजतच प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. सध्या अग्निशमन दलाकडून आग विजविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. हेड वायर तुटल्याने प्लॅटफॉर्म 3 वरील वाहतूक तूर्तास बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक प्लॅटफॉर्म 1 व 2 वर वळवण्यात आली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे मुंबई कडे जाणारी रेल्वे विस्कळीत झाली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.