Crimes : बंदुकीचा धाक दाखवून मुंबईमध्ये व्यावसायिकांचे अपहरण, आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलांसह , 15ते 16 जणांना विरुद्ध गुन्हा दाखल

पुणे दिनांक १० ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन टीम) बंदुकीचा धाक दाखवून मुंबई मधील एका व्यावसायिकांचे अपहरण केल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलांसह अन्य १५ ते १६ जणांना विरुद्ध आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची घटना ही मुंबईमधील गोरेगाव येथील ग्लोबल म्युझिक जंक्शन येथील कार्यालयात गोंधळ घातला व व्यावसायिकांच्या कार्यालयातून त्यांचे अपहरण करून शिविीगाळ व मारहाण करून आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयात नेउन तिथे स्टॅम्प पेपरवर जबरदस्तीने स्वाक्षरी घेत करारनामा रद्द झाल्याचे दिसून घेंतलं , याबाबत फिर्यादी राजकुमार सिंह यांनी मुंबईमधील वनराई पोलिस ठाण्यात राज सुर्वे.मनोज मिश्रा.पद्माकर.विकी शेट्टी.व अज्ञातांन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार. या घटनेबाबत व्यावसायिक राजकुमार सिंह यांनी दाखल केलेल्या फिर्यादी मध्ये म्हणाले आहे की. " आपण मनोज मिश्रा यांच्या बरोबर केलेल्या वर्षांचा करारनामा केला होता.मात्र मनोज मिश्रा यांनी पैसे परत न करता हा करारनामा जबरदस्तीने रद्द करण्याकरिता शिवीगाळ व मारहाण केली.व त्यानंतर माझ्या कार्यालयातून मला ओढत नेउन कारमध्ये बसवून आमदार प्रकाश सुर्वे यांच्या दहिसर पूर्व मधील युनिव्हर्सल जवळील कार्यालयात आणून त्यांनंतर आपल्या कडून जबरदस्तीने १०० रुपायांच्या स्टॅम्प पेपरवर मनोज मिश्रा यांच्या बरोबर केलेला करारनामा रद्द झाला असे लिहून घेतलं."
दरम्यान पोलिसांनी या व्यवसायीकांची अपहरणकर्त्यांनपासून सुटका केली आहे".व्यावसायीक राजकुमार यांनी आदिशक्ती फिल्मसचे मालक व आरोपी मनोज मिश्रा यांना संगीत निर्मितीसाठी साडेआठ कोटी रुपये दिले होते." अशी माहिती राजकुमार सिंह यांचे वकील सदानंद शेट्टी यांनी दिली आहे.सदर फिर्यादी नंतर पोलिसांनी स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांच्यासह इतर जणांना विरुद्ध शस्त्रास्त्र कायद्याखाली व अनेक कलमा अंतर्गत वनराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पुढील तपास वनराई पोलिस करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.