बंदला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद : धनगर समाजाचा वतीने बारामतीत आज बंदची हाक

पुणे दिनांक १६ नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) धनगर समाजाला राज्य सरकारच्या वतीने ४५ दिवसांत आरक्षणांचा मुद्दा मार्गी लावू असे धनगर समाज यांच्या शिष्टमंडळाला आश्र्वासन देण्यात आले होते.सरकार ने दिलेला कालावधी संपल्यानंतर धनगर समाजाच्या वतीने आज बारामती बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
दरम्यान धनगर समाजाच्या वतीने आरक्षण मिळावे म्हणून मागील आठ दिवसांपासून बारामती येथे चंद्रकांत वाघमोडे या तरुणांने उपोषण सुरू केले आहे.उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बारामती बंदचे आज आयोजन करण्यात आले होते.बंदला आज चांगला प्रतिसाद मिळाला आहे.दरम्यान धनगर समाजाला आरक्षण व उपोषणाकडे राज्य सरकार हे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.दरम्यान आजच्या बारामती बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असून बाजारपेठात सर्वत्र शुकशुकाट आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.