कॅनडा सरकारने वाढविली इंडिया फ्लाइटची सुरक्षा व्यवस्था : एअर इंडियाच्या प्रवाशांना धमकी कॅनडा स्थित खलिस्तानी दहशतवादीने दिली धमकी

पुणे दिनांक १० नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) खलिस्तानचा समर्थक गुरपतवंग सिंग पन्नू याने १९ नोव्हेंबरला एअर इंडियाची फ्लाइट उडवून देण्याची धमकी दिली आहे.त्यावर भारत सरकार हे चांगलेच ऍक्शन मोडवर आले असून यासर्व पार्श्वभूमीवर आता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी चिंता व्यक्त केली आहे.दरम्यान अशा कट्टरवादी घटकांना आपल्या देशात आश्रय देणाऱ्या परदेशी सरकारवर दबाव टाकणार आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.आम्ही या धमक्यांचा निषेध करतो. असे त्यांनी म्हटले आहे.आणि आम्ही सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे.असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
दरम्यान याप्रकरणी एअर इंडिया विमानातून १९ नोव्हेंबरला प्रवास करू नका.असं आवाहन खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंग सिंग पन्नूने शिखांना केले आहे.तसेच भारतीय फ्लाइट उडवून देण्याची धमकी दिली आहे.भारताने याबाबत चिंता व्यक्त केली आहे.दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता कॅनडा सरकारने पन्नूने दिलेली धमकी ही गांभीर्याने घेतली असून कॅनडाने आता ऍक्शन मोडवर येत एअर इंडिया फ्लाइटची सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. दरम्यान ह्या पार्श्वभूमीवर भारताने भारतीय वंशाच्या खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंग सिंग पन्नू याला कॅनडा मध्ये आश्रय दिल्याबद्दल देशाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.