अपघातानंतर कारचा झाला चक्काचूर : मुंबई ते आग्रा महामार्गावर कारची व कंटेनरचा भीषण अपघात . कारमधील चौंघाचा घटनास्थळीच मृत्यू

पुणे दिनांक १८ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबई ते आग्रा महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात झाला आहे.कार व कंटेनरमध्ये हा भीषण अपघात झाला आहे.यात कार मधील चौंघाचा मृत्यू झाला आहे.या भीषण अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.या घटने बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई आग्रा महामार्गावर नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील नमस्कार जवळ कार व कंटेनर या दोन वाहनाची भीषण टक्कर झाली व अपघात झाला आहे.
दरम्यान कार मधील सर्व मृत व्यक्ती हे धुळ्यातील असलेच्या समजत आहे.हे सर्वजण नाशिक वरुन कारने धुळ्याकडे जात असताना हा अपघात झाला आहे.या अपघातानंतर कार मधील मृतांची आद्याप ओळख पटलेली नाही.या अपघातात कारचा चक्काचूर झाली आहे.व घटनास्थळी कार मधील चौंघाचा मृत्यू झाला आहे.अपघाता नंतर मुंबई ते आग्रा महामार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडली होती.पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.