Crime : सीबीआयने तब्बल ५ कोटींची लाच घेतल्याप्रकरणी ईडीच्या सहायक संचालकसह इतर ६ जणांना अटक

पुणे दिनांक २९ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) कुंपणच शेत खातय म्हणले तर वावगं ठरणार नाही.दिल्ली दारु घोटाळ्यात आता नवीन घडामोड घडली असून सीबीआयने सोमवारी दिनांक २८ ऑगस्टला ईडीचे सहायक संचालकसह इतर अन्य ६ अधिकाऱ्यांना अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या या अधिकाऱ्यांवर दिल्लीतील दारू घोटाळा प्रकरणातील एका आरोपींकडून तब्बल ५ कोटींची लाच घेतल्याप्रकरणी आरोप आहे.
दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती अशी की ईडीचे सहायक संचालक पवन खत्री यांनी मद्यविक्रेते अमनदीप धल्ल यांच्या कडून ५ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करणात आला आहे. तसेच याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी दिल्ली दारु घोटाळ्यात सीबीआयने ईडीचे सहायक संचालक पवन खत्री यांच्यासह अन्य इतर आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घोटाळ्यात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. आता या दारु घोटाळ्यात सीबीआयने ईडीचे सहायक संचालक व इतर सहा अधिकारी यांना अटक केल्यानंतर आता नवीन घडामोड घडली आहे.त्यामुळे आता या दिल्ली मधील दारु घोटाळ्यात पुढे काय वळण घेते पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.पण एकंदरीत या प्रकरणी कुंपणच शेत खातय...असे म्हणने वावगं ठरणार नाही हे मात्र खरं
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.