Rupesh Patil Dadagiri : नवी मुंबईत खारघर येथे एकनाथ शिंदे गटाचे रुपेश पाटील यांची दादागिरी सी सी टिव्हीत मारहाणीचे फुटेज

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते रुपेश पाटील यांनी त्यांच्याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी पाटील यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाले पण आता त्यांच्या गटाचे कार्यकर्ते व आमदार आत्ता चांगलेच हाणामारीच्या ॲक्शन मोडमध्ये येऊन त्यांनी दादागिरी चालू केली आहे. याबाबत नुकतीच एक घटना नवी मुंबई मधील खारघर या ठिकाणी घडली असून. त्यांच्याच गटाचे नेते रुपेश पाटील यांनी त्यांच्याच बिल्डिंग मधील एका व्यापाऱ्याला मारहाण केली असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. आता खारघर पोलिसांनी पाटील यांच्यावर मारहाण व धमकी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सदर घटनेबाबत खारघर पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की. रुपेश पाटील यांच्यावर आपल्याच बिल्डिंग मधील एका या पर्यायाला मार हा ण केली आहे. दुकाना बाहेर लावलेले वाहन काढण्यास नकार दिल्याच्या कारणावरून रुपेश पाटील व त्यांच्या बरोबर असलेल्या माणसांनी मारहाण केल्याची फिर्याद दुकान चालक मनीष तिरपीट यांनी खारघर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर खारघर पोलिसांनी रुपेश पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून सदर प्रकरणाचा पुढील तपास खारघर पोलीस करीत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.