३१ जुलैला धावत्या ट्रेनमध्ये आरपीएफचा गोळीबारात झाला होता चौंघाचा मृत्यू. : जयपूर - मुंबई एक्सप्रेस गोळीबार प्रकरणी रेल्वे आरपीएफवर आरोपपत्र दाखल

पुणे दिनांक २१ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) ३१ जुलैला जयपूर -मुंबई सेंट्रल धावत्या सुपरफास्ट एक्स्प्रेस मध्ये ट्रेनमध्ये ऑनड्यूटी रेल्वे सुरक्षा बलाचा आरपीएफ यांने त्यांच्या कडील रिव्हालवर मधून ट्रेन मधील प्रवासी व त्यांचे वरिष्ठ असे एकूण चौंघांवर गोळीबार करून त्यांना मारले होते.यात चौंघा जणांचा घटना स्थळीच मृत्यू झाला होता.आरोपीला रेल्वे पोलिसांनी अटक केली होती.आज त्याच्यावर मुंबई मधील बोरिवली रेल्वे पोलिसांनी १हजार २०६ पानांचे आरोपपत्र बोरिवली येथील न्यायालयात दाखल केले आहे.
दरम्यान ३१ जुलैला जयपूर ते मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेस मध्ये ड्यूटीवर असलेल्या आरपीएफने पहाटे साडेपाच वाजता रेल्वे ट्रेन ही पालघर रेल्वे स्टेशन जवळ आल्या नंतर त्याच्या कडील रिव्हालवर मधून तीन रेल्वे प्रवासी व त्यांचे सिनिअर सह्हायक पोलिस निरीक्षक असे तिंघानवर गोळीबार करून त्यांना ठार मारले होते.या घटने नंतर रेल्वे पोलिसांनी आरपीएफचा जवान चेतन सिंग चौधरी याला अटक करण्यात आली होती.याच गोळीबार प्रकरणी पोलिसांनी आज बोरिवली येथील न्यायालयात १ हजार २०६ पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.चेतन याला सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयात हजर राहण्याची विनंती करुन बोरिवली दंडाधिकाऱ्यांकडे आरोपपत्र सादर केले आहे.पोलिसांनी एकूण तींघांचे जबाब न्यायाधीशांसमोर नोंदवले आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.