Crime : चतु:श्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भाईगिरी करणारा अट्टल गुन्हेगाराची एम पी डी ए कायद्या न्वये अमरावती कारागृहात रवानगी

पुणे दिनांक ९ जुलै ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम ) चतुः श्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भाईगिरी करणारा अट्टल गुन्हेगार व दहशत माजवणारा गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार यांनी एम पी डी ए कायद्या न्वये अमरावती कारागृहात रवानगी केली आहे. आयुक्तची ही कारवाई २९ वी स्थानबध्देतेची कारवाई आहे.
आरोपीचे नाव शुभम उर्फ ताया सुनिल दुबळे ( वय २१.राहणार फ्लॅट नंबर ४०३ चिंतामणी सोसायटी मानाजी नगर गणपती माथ्या जवळ न-हे पुणे ) असे आहे. हा पुणे पोलीस आयुक्तालयातील चतुःश्रुंगी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून याने त्याच्या अन्य साथीदारा मार्फत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भागात घातक हत्यारा सह खूनाचा प्रयत्न. जबरी चोरी. घातक शस्त्रा द्वारे दुखापत करणे. दंगा करणे. बेकायदेशीर हत्यार बाळगणे. या सारखे ५.वर्षात त्यांच्यावर एकूण ५ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या मुळे या भागात कायदा सुव्यवस्था मध्ये बाधा निर्माण झालेली होती. व त्यांच्या विरोधात भिती पोटी कोणिही तक्रार दाखल करत नव्हते.
या बाबत चतुःश्रुंगीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे पुणे शहर पी सी बी शाखा यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या कडे प्रस्ताव पाठविला होता. सदर प्रस्तावाची कागदपत्राची पडताळणी करून आरोपी ची एम पी डी ए कायद्या न्वये अमरावती कारागृहात १ वर्षा करिता स्थानबध्द करण्याचे आदेश दिले आहेत. व त्यांची रवानगी केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची ही २९.वी कारवाई आहे. या पुढे देखील पुणे शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे गुन्हेगार यांच्या वर प्रतीबंधक कारवाई करण्यात येणार आहे. असे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.