शासकीय निवासस्थानी सुरक्षाव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर वाढ : छगन भुजबळांना पुन्हा अज्ञात व्यक्तीने फोनवरुन दिली जीवे ठार मारण्याची धमकी

पुणे दिनांक ७ नोव्हेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी भूमिका अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली आहे.व त्यांनी वेळोवेळी जाहीर पणे विरोध दर्शविला आहे.त्याच्या या सातत्याने विरोध केल्याने आता मराठा समाज आक्रमक झाला आहे.याताच अज्ञात व्यक्तीने भुजबळ यांना फोन करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.सदरच्या धमकी नंतर पोलिसांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी सुरक्षाव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे.
दरम्यान मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या आमची मागील काही दिवसांपासून आमची भूमिका आहे.त्यासाठी आमच्या आरक्षला धक्का लावू नका असं म्हणत भुजबळ यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला विरोध केला आहे.एकदा ओबीसी समाजाने आरक्षण गमावले तर ते पुन्हा मिळणार नाही.असे वक्तव्य भुजबळ यांनी केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांना वेळीच आवरा अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.अशातच छगन भुजबळ यांनी आपल्याला जीवेठार मारण्याची धमकीचे फोन येत आहे.असे म्हटले आहे.याकारणास्तव भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था मध्ये प्रचंड प्रमाणावर वाढ केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.