उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील संध्याकाळी करणार मोठी घोषणा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडण्यासाठी आंतरवली सराटीला जाणार

पुणे दिनांक १३ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मागील १६ दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषण सुरूच आहे.जोप्रर्यत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे जालन्यात येत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार व संभाजीराजे व उदयनराजे भोसले यांनी देखील जालन्यात यावे असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.व मराठा आंदोलंकानी आज देखील आंदोलन सुरू ठेवले आहे.बुलढाणांतील मराठा आंदोलंक आक्रमक झाले आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत गावात यावे.मी उपोषण सोडेल पण साखळी उपोषण सुरूच ठेवणार आहे.अशी अट उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी ठेवली आहे. दरम्यान आज पाच वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार व पुण्याचे पालकमंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील जाणार आहेत.व जरांगे पाटील यांचे उपोषण सोडणार आहेत.मनोज जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा १६ वाढ दिवस आहे. दरम्यान पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करुन तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत.सरकारच्या वतीने जी समिती नेमली आहे.त्यामध्ये उपसमितीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत पाटील हे अध्यक्ष आहेत.ते देखील उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर चर्चा करुन त्यांची भूमिका समजावून घेणार आहेत.अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.