Nashik bus accident : नाशिक बस अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून घटनास्थळाची पाहणी

नाशिक मध्ये आज पहाटेच्या सुमारास ट्रकने लक्झरी प्रवासी बसला जोरात धडक दिल्याने. बसने पेट घेऊन बसचा फक्त सांगडाच शिल्लक राहिला या दुर्घटनेत एकूण बारा प्रवासी यांना आपला जीव गमवावा लागला तर एकूण आठ प्रवासी एक गंभीरित्या भाजले असून त्यांना शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. सदर दुर्घटनेचे पाहणी करण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने नाशिक येथे रवाना झाले.व त्यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी नाशिक मधील जिल्हा रुग्णालयात देखील जाऊन अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची विचारपूस केली आहे.
आज पहाटेच्या सुमारास यवतमाळ इथून मुंबईकडे चिंतामणी ट्रॅव्हल्स कंपनीची बस येत असताना नाशिक शहरातील औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल जवळ ट्रक व बस यांच्यात भीषण अपघात होऊन. बसला अचानकपणे आग लागली. सर्व प्रवासी हे साखर झोपेत असताना अचानकपणे आग लागल्याने काही प्रवाशांनी उड्या घेत आपला जीव वाचविला तरी यात एकूण बारा प्रवाशांना आपला जीव गमवायला लागला आहे तर एकूण ३८ प्रवासी जखमी झाले आहे. यात गंभीरित्या भाजलेल्या काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याने या मृतदेहाची ओळख पटविणे देखील अवघड झाले आहे. मुख्यमंत्री यांनी जखमी प्रवाशांना व मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना यावेळी धीर दिला आहे. व या संपूर्ण अपघाताची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिली आहेत. मृत्यू झालेल्या नातेवाईकांना भरपाई म्हणून ५ लाख रुपये देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच जखमी झालेल्या प्रवाशांचा संपूर्ण खर्च हा महाराष्ट्र शासनाच्या वतीने केला जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या बस दुर्घटनेच्याबाबत शोक व्यक्त केला असून केंद्र सरकारच्या वतीने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये देण्याची यावेळी त्यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शरद पवार व महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच छगन भुजबळ खासदार हेमंत गोडसे यांनी देखील या अपघाताबाबत व दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे व नाशिकचे खासदार हेमंत गोडसे व गिरीश महाजन सह अन्य पदाधिकारी होते यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासन व अधिकारी यांच्याकडून अपघाताची माहिती घेतली व कोणत्याही परिस्थितीत जखमी प्रवाशांवर चांगल्या पद्धतीने उपचार झाले पाहिजे गरज पडल्यास खाजगी हॉस्पिटलची देखील मदत घ्या असता अशा सूचनास त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.