लालबागच्या राजाच्या दर्शनरांगेतील भाविक व मंडळाचे पदाधिकारी यांच्यात फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल : मुंबईतील लालबागच्या राजाच्या मंडपात पदाधिकारी व भाविक यांच्यात हाणामारी

पुणे दिनांक २२ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईतील लालबागचा राजा मंडपात आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे.दर्शन रांगेत मंडाळाचे पदाधिकारी व भाविकांन मध्ये ही हाणामारी झाली आहे व या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल मोठ्या प्रमाणावर झालेला आहे.सदरचा व्हिडिओ बघून गणेश भक्त मोठ्या प्रमाणावर नाराज झाले आहे.
दरम्यान मुंबईचा राजा हा नवसाला पावणारा गणपती बाप्पा असून बाप्पाच्या दर्शनासाठी खूप लांबून भाविक मोठ्या प्रमाणावर येतात व तासंतास रांगेत लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने व भक्ती भावाने रांगेत उभे राहतात.पण दरसाल प्रमाने यावर्षी देखील लालबाग राजा गणेशोत्सव मंडळ नियोजन करण्यात कुचकामी ठरलं आहे.व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये मंडाळाचे पदाधिकारी हे भाविकांना मारहाण करत आहेत.असं स्पष्ट दिसत आहे.व याच दरम्यान मांडवा मध्ये प्रचंड गोंधळ उडालेला दिसत आहे.या वेळी पोलिस कुठेच दिसत नाही.व मंडाळाचे पदाधिकारी यांच्या हातात एकंदरीत रांगेचे नियोजन दिसत आहे.व त्यामुळेच अशा मारहाणीच्या घटना घडत आहेत.दोनच दिवसांपूर्वी येथे चेंगराचेंगरी देखील झाली होती.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.