Crime : एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याने संगणक अभियंताची आत्महत्या. चौंघा विरोधात गुन्हा दाखल

  • संपादक : भरत नांदखिले
  • 16 Jul 2023 10:12:25 PM IST
Crime

पुणे दिनांक १६ ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम)  पुण्यात धक्कादायक घटना घडली असून खराडी भागातील संगणक अभियंता युवकाने आर्थिक फसवणूक झाल्याने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी चौंघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

गुंतवणुकीत फसवणूक झाल्याने पुण्यातील खराडी भागातील एक संगणक अभियंता असलेल्या युवकाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. सदरच्या अंभियंता युवकाला आत्महत्या करण्यास परावृत केल्या प्रकरणी अष्टविनायक फर्म या गुंतवणूक सल्लागार संस्थेच्या सल्लागारांविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आत्महत्या केलेल्या संगणक अभियंता यांचे नाव प्रभात शंभुप्रसाद रंजन  ( वय ४६ राहणार विठ्ठल नगर खराडी पुणे) असे आहे. या बाबत अष्टविनायक फर्मचे संचालक गुन्हे दाखल झालेल्यांची नावे १) सेल्वा नाडर.२) प्रसाद शिंदे. ३) सचिनकुमार ४)अजिंक्य लोखंडे.असे गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी राजीव शंभुप्रसाद रंजन यांनी चंदननगर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अजून गुन्हा दाखल झाल्याल्यांना अटक करण्यात आली नाही. 

दरम्यान पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभात शंभुप्रसाद रंजन हे पुण्यातील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनी मध्ये नोकरी करीत होते. त्यांनी दिनांक १३ जुलै रोजी पहाटे पावने चार वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली. आत्महत्या पूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत फसवणूक झाल्या प्रकरणी आत्महत्या करीत आहे असे लिहिले होते. व चिठ्ठीत सेल्वा नाडर.प्रसाद शिंदे. यांनी प्रभात यांना  विविध बॅका कडून ९० लाख रुपये कर्ज काढण्यास परावृत केले होते .जुलै २०२१ मध्ये त्यांनी कर्ज काढले व त्या नंतर अष्टविनायक फर्मने त्यांचे कार्यालये बंद केले. सचिनकुमार यांने गुंतवण्कीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषा पोटी प्रभात यांच्या कडून १५ लाख रुपये घेतले होते .प्रभात यांची आलीशान कार अजिंक्य लोखंडे यांनी साडेसात लाख रूपायांना विकत घेतली पण सदर व्यावाहारातील साडेचार लाख रुपये दिले नव्हते. व अष्टविनायक फर्मचे संचालक आणी त्यांच्या साथीदार यांनी आपसात संगनमत करून प्रभात यांची एकूण १ कोटी १७ लाख ५० हजार रूपायांची आर्थिक फसवणूक केल्याचे प्रभात रंजन यांची फसवणूक केली. या प्रकरणी प्रभात यांचे भाऊ राजीव रंजन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हणाले आहे. 

संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.

Crime Pune Crime News
Find Pune News, Crime News, Pune Crime News, latest Pune marathi news and Headlines based from Pune City. Latest news belongs to Pune crime news, Pune politics news, Pune business news, Pune live news and more at Polkholnama.

इतर संबंधित बातम्या

इतर क्राईम बातम्या

डाउनलोड पोलखोलनामा अँड्रॉइड अँप

Google Play Store

ताज्या बातम्या

सुदैवाने कोणतीही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही. : कुर्ला येथील नेहरूनगर मधील इमारतीची संरक्षण भिंत कोसळली.३ते ४ इमारतीतील नागरिकांना सुरक्षित जागी हलवले
नागपूरात अनोखे स्वगाताचे बॅनर लावत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने सरकारला चिमटा काढला आहे. : हिवाळी अधिवेशनापूर्वी शरद पवार गटाच्या बॅनर्स चर्चा.नागपूरच्या चौका चौकात झळकले बॅनर
शीव येथे घडली ' स्पेशल २६ ' सिनेमा सारखी घटना : तोतया अधिकाऱ्यांचा व्यावसायिकांच्या निवासस्थानी छापा ,१८ लाख रुपयांची रोकड घेऊन ठोकली धूम
भावीक परभणी जिल्ह्यातील पालम येथील : पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या पिक‌अपला भीषण अपघात,२२ भावीक गंभीर रित्या जखमी
Crimes Ahamadnagar : अहमदनगर मध्ये शेतकऱ्यांनी झाडाला गळफास लावून केली आत्महत्या
'बॅलेट पेपर ' निवडणूका घेण्याची केली मागणी : ईव्हीएमचा मूड म्हणजे जनतेचा मूड नाही, उध्वव ठाकरे गटाची सरकारवर टीका
पुजा सुरु असतानाच बाबांच्याच तोतया पोलिसांनी रेड मारुन पळविले १८ लाख रुपये : हडपसर येथे पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून भोंदू बाबाने युवकांना लावला १८ लाख रुपयांना चुना
दाखल गुन्हा व आरोपपत्र केले रद्द : नवऱ्याला झाडूने मारणांऱ्या बायकोला हायकोर्टाचा दिलासा.

शहरातील बातम्या