अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान फंडातून २ लाख तर मुख्यमंत्री फंडातून ५ लाख रुपये प्रत्येकी देण्याची घोषणा : समृध्दी महामार्गावरील भीषण अपघातावर पंतप्रधान मोदी यांच्याकडून शोक व्यक्त तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांच्या कडून देखील शोक व्यक्त

पुणे दिनांक १५ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) संभाजीनगर येथे समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात एकूण १२ प्रवासी यांचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आहे.यात एक सहा वर्षांच्या चिमुकलीचा देखील समावेश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत या दुर्घटने बाबत शोक व्यक्त केला आहे.तसेच या घटनेतील मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये व तर जखमींना देखील पंतप्रधान फंडातून पन्नास हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्याजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या अपघातातील मृत्यू प्रकरणी शोक व्यक्त केला आहे.व मुख्यमंत्री फंडातून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये व यात जखमी झालेल्या प्रवाशांचा रुग्णालयातील खर्च महाराष्ट्र सरकार करणार आहे.तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या अपघातातील १२ जणांच्या मृत्यू प्रकरणी शोक व्यक्त केला आहे.या अपघातात जखमी झालेल्या १४ प्रवाशांना घाटी येथील रुग्णालयात तर उर्वरित ६ जणांना वैजापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.