Crime : पक्क्या अनुज्ञप्तीसाठी मासिक दौ-याचे आयोजन

पुणे दिनांक २७ ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) ऑगस्ट २०२३ मध्ये पक्की अनुज्ञप्ती मिळवण्याचा दुष्टीने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालया च्या वतीने पुणे जिल्ह्यातील खेड. मंचर .जुन्नर. वडगाव मावळ .व लोणावळा. या भागात मासिक दौ-याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पिंपरी-चिंचवड उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.
दरम्यान पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणी साठी दिनांक २ व ३ ऑगस्ट रोजी खेड व दिनांक ७ व ८ ऑगस्ट रोजी मंचर .दिनांक १८ ऑगस्ट रोजी जुन्नर . व २२ ते २३ ऑगस्ट रोजी वडगाव मावळ. व २८ ऑगस्ट रोजी लोणावळा. इत्यादी ठिकाणी मासिक दौ-याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीसाठी दिनांक ३१ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता कोटा उपलब्ध होणार आहे. असे पिंपरी- चिंचवड उप प्रादेशिक परिवहन विभागाने कळविण्यात आले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.