खाकी वर्दीतला नराधम! : दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलींबरोबर अश्लील चाळे करणारा पोलिसांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक ३ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे जिल्ह्यातील नारायण गाव भागातून एक नवीन अपडेट समोर आली असून धक्कादायक आहे.नारायण गावातील दहा वर्षांची मुलगी ही क्लास वरुन घरी येत असताना पोलिसांने दहा वर्षांच्या मुली बरोबर अश्र्लिल चाळे केले आहे.त्यामुळे आता एका पोलिसा मुळे सर्वच पोलिसांनची प्रतिमा मळीन होऊन खाकी वर्दीलाच डाग लागला आहे.या पोलिस कर्मचाऱ्यांस संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी त्या पोलिस कर्चाऱ्यांला पकडून पोलिसांनच्या ताब्यात दिले आहे. नारायण गाव पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
या दरम्यान पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या पोलिस कर्मचारी याचे नाव नारायण भाऊसाहेब बर्डे असे आहे.तो जुन्नर तालुक्यातील तालुक्यातील ओतूर पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत आहेत.यांने दहा वर्षांची मुलगी आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घरी येत असताना तिला आडवून १०० रुपये देतो असे सांगून तिला गाडीवर बस म्हणाला त्याला मुलीने नकार दिल्यानंतर तिच्या सोबत अश्र्लील कृत्य केले.हा सगळा प्रकार पाहून मुलगी घाबरली व रडत घरी गेली व आजीला सर्व घडलेला प्रकार सांगितला यावेळी पालक संतप्त झाले.व मुलींच्या क्लासचा शोध घेतला.यावेळी त्यांना बर्डे दिसला त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज गावकऱ्यांनी पोलिसांना दिले आहे.या प्रकरणी पुढील तपास नारायण गाव पोलिस करीत आहेत.दरम्यान ही घटना गंभीर स्वरूपाची आहे.आता या पोलिस कर्मचाऱ्या विरुद्ध पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक काय कारवाई करतात हे पाहणे औचित्यक्याचे ठरणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.