Pune Crime : क्रिकेट बेटींगच्या मास्टर माईंडवर सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेचा छापा

२५ सप्टेंबर २०२२ रोजी मा. वरिष्ठांकडुन गोपनीय माहिती प्राप्त झाली की, सिटीवुड सोसायटी, प्लॅट नं. 505, सॅलेसबरी पार्क, मार्केट यार्ड पुणे येथे राहते प्लॅट मध्ये बेकायदेशिर ऑन लाईन क्रिकेट बेटींग चालु आहे. सदर गोपनिय बातमीची खातरजमा करण्याकरीता सामाजिक सुरक्षा विभागाकडील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकुन तेथे हजर असलेल्या दोन इसमांकडील मोबाईल चेक केले असता त्या मोबाईल मध्ये लोटस बेटींग करीता ब्राोकरला व क्लार्इंटला बेकायदेशीरपणे लॉगीन आयडी पासवर्ड देवुन त्या बदल्यात क्रिकेट बेटींगच्या हार जीतवर बेकायदेशीरपणे स्वत:चे अर्थिक फायद्यासाठी 12 टक्के रक्कम कमीशन स्वरूपात मोबादला घेत असलेबाबत आढळुन आल्याने त्यांचेकडील 90,000/- रू.कि. चे दोन मोबाईल हॅन्डसेटसह त्यांना ताब्यात घेउन त्यांचे विरूध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 4 (अ)5 सह भारतीय टेलीग्राफ अॅक्ट कलम 25 (क) अन्वये स्वारगेट पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर करीत आहे.
सदरची कारवाई श्री. अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त,गुन्हे, पुणेे, श्री. श्रीनिवास घाडगे पोलीस उप आयुक्त गुन्हे, यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच सपोनि अश्विनी पाटील, पोउपनि श्रीधर खडके, पोलीस अंमलदार प्रमोद मोहिते, आण्णा माने, पुष्पेंद्र चव्हाण, अमित जमदाडे,मनिषा पुकाळे या पथकाने यशस्वी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.