ड्रग्जचं रॅकेट ससून रुग्णालयात : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातून दोन कोटींचे ड्रग्स केले जप्त

पुणे दिनांक १ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील ससून हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वारावरच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १ किलो ७५ ग्रॅमचे मेफिड्रोन ड्रग्स जप्त केले आहे.या ड्रग्सची मार्केट मध्ये किंमत जवळपास २ कोटी रुपयांची आहे.या ड्रग्स रॅकेट मध्ये हायप्रोफाइल आरोपी गुंतल्याचा संशयावरून दोन युवक व मुख्य आरोपी ललित पटेल हा सहभागी असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान या प्रकरणी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ललित पटेल हा कुख्यात आरोपी असून त्याला या पूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे व त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती. तो वैद्यकीय उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.तो हाॅस्पीटलमध्ये असतांना देखील हे रॅकेट चालवले कसे जाते.याचा तपास आता गुन्हे शाखेचे पोलिस करीत आहेत.दरम्यान या रॅकेट मध्ये ससून हॉस्पिटलमधील कोण कर्मचारी यात सहभागी आहे का.याचा देखील तपास गुन्हे शाखेचे पोलिस करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.