Crime : पुण्यातील बुधवार पेठेत बेकायदेशीर रित्या रहाणाऱ्या १९ जणांच्या गुन्हे सामाजिक सुरक्षा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक १ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील बुधवार पेठेत बेकायदेशीर रित्या रहाणाऱ्या एकूण १९ जणांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी गुरुवारी रात्री मोठी कारवाई केली आहे.यातील सर्वांना अटक करण्यात आली असून या मध्ये महिला व पुरुषांचा समावेश आहे.त्यांना पुढील कारवाई साठी फरासखाना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार यातील अटक आरोपी हे भारतात राहण्या करीता व्हिजा व पासपोर्ट तसेच कायदेशीर कागदपत्रे नसताना बेकायदेशीर रित्या पुण्यातील बुधवार पेठेतील कुंटण खात्यात राहत होते.या मध्ये १० मुली व ९ पुरुष असे १९ जण राहत होते.यांच्याकडे भारतीय नागरिकत्वाचे कोणत्याही प्रकारचे कायदेशीर पेपर अथवा पासपोर्ट नसल्याची माहिती व तसेच ते बांगलादेशी असल्याची माहिती गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना मिळाल्या नंतर पोलिसांनी याची खात्री करण्यासाठी वरिष्ठांशी सलामसलत करून या ठिकाणी छापा टाकून त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई साठी फरासखाना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
दरम्यान सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त रितेश कुमार.सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक.अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे.पोलिस उपआयुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव.सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे . सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे.पोलिस अंमलदार.अमेय रसाळ.सागर एकाच.राजेद्र कुमावत.बाबासो कर्पे.तुषार भिवरकर.मनिषा पुकाळे.व अमित जमदाडे यांच्या पथकाने केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.