Extorted and Jailed : माजी नगरसेवकास धमकी देवून खंडणी उकळणाया गुन्हेगाराला केले तेलंगणा येथून जेरबंद

माजी नगरसेवक बाबा ऊर्फ दिपक धोंडीबा मिसाळ, कॅम्प, पुणे यांना दि. 18/09/2022 ते 23/09/2022 दरम्यान त्यांचा स्वत:चा संपर्क क्रमांक तसेच त्यांची भावजय मा.आमदार माधुरी मिसाळ यांचे कार्यालयातील जनसंपर्कासाठीचा संपर्क क्रमांक यावर कोणीतरी अनोळखी व्यक्ती याने अनोळखी क्रमांका वरुन दिपक मिसाळ यांना फोन करुन तसेच मेसेज पाठवून गुगल पे द्वारे पैशांची मागणी करुन पैसे न दिल्यास फिर्यादी दिपक मिसाळ यांना जिवे ठार मारणेची धमकी दिले बाबत फिर्यादी दिपक मिसाळ यांनी दिलेले तक्रारी वरुन बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करणेत आला.
दाखल गुन्ह्राचा पुढील तपास अनिता हिवरकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे),बिबवेवाडी पोलीस ठाणे, पुणे या करीत असताना दाखल गुन्ह्रातील अनोळखी आरोपी याने फिर्यादी यांना खंडणी मागणेसाठी व धमकावण्या साठी वापरलेले मोबाईल क्रमांकांची माहीती घेवून त्याचे तांत्रिक विश्लेषन करता सदरचे क्रमांकां पैकी एक मोबाईल क्रमांक वापरणारा अनोळखी व्यक्ती हा इम्रान समीर शेख, घोरपडीगावं, पुणे हा असलेचे निष्पन्न झालेने त्याचा तपास पथकाचे प्रभारी अधिकारी प्रविण काळुखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी स्टाफसह प्राप्त पत्यावर शोध घेतला असता तो राहते घर सोडून गेला असले बाबत माहीती मिळाली. तक्रारीतील प्राप्त मोबाईल क्रमांकाचे सखोल तांत्रिक विश्लेषन करता आरोपी हा कामारेड्डी, तेलंगणा राज्य येथे असलेची माहीती प्राप्त झालेने मा.वरीष्ठांचे सुचना व मार्गदर्शना प्रमाणे बिबवेवाडी पोलीस ठाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.प्रविण काळुखे व पोलीस अमंलदार शाम लोहोमकर,सतीश मोरे,तानाजी सागर यांनी तात्काळ कामारेड्डी, तेलंगणा राज्य येथे जावून गोपनिय माहीती मिळवून आरोपी इम्रान शेख याचा शोध घेता तो मिळून आलेने त्याचेकडे तपास करता त्याने दाखल गुन्हा केलेचे कबुल केलेने व तसे तपासात निष्पन्न झालेने त्यास कामारेड्डी, तेलंगणा राज्य येथून पुणे येथे घेवून येवून दाखल गुन्ह्राचे कामी अटक करुन मा.न्यायालयामध्ये हजर ठेवले असता मा. न्यायालयाने त्याची दि. 03/10/2022 रोजी पर्यंत पोलीस कोठडीची रिमांड मंजूर केली असून आरोपीने गुन्ह्राचे कामी वापरलेले मोबाईल फोन व सिमकार्ड जप्त करणेत आले आहेत.
उपरोक्त आरोपी इम्रान शेख याचे विरुध्द चंदननगर पोलीस ठाणे,पुणे येथे गुन्हा रजि.नं. 98/2022, भा.दं.वि.कलम 509,507,506,504,500 प्रमाणे गुन्हा दाखल असून त्यामध्ये त्यास अटक झाली असून सध्या तो जामीनावर आहे.तो जामीनावर असताना त्याचे विरुध्द चंदननगर पोलीस ठाणे,पुणे येथे 1) गुन्हा रजि.नं.269/2022, भा.दं.वि.कलम 420,467,468,471,500,34 2)गुन्हा रजि.नं. 352/2022,भा.दं.वि.कलम 507,500,माहीती तंत्रज्ञान अधिनियम कलम 67 प्रमाणेे गुन्हे दाखल असून त्या मध्ये तो फरार आहे.
सदरची कामगिरी मा.श्री.नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त साो,पुर्व प्रादेशिक विभाग,पुणे शहर, मा.श्रीमती नम्रता पाटील,पोलीस उप आयुक्त साो,परिमंडळ-05, पुणे शहर,मा.श्रीमती पौर्णिमा तावरे, सहाय्यक पोलीस आयुक्त साो,वानवडी विभाग,पुणे शहर यांच्या मार्गदर्शना नुसार श्रीमती संगिता जाधव,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बिबवेवाडी पोलीस ठाणे यांच्या सुचने प्रमाणे श्रीमती अनिता हिवरकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे), बिबवेवाडी पोलीस ठाणे, पुणे शहर तसेच तपास पथकातील प्रभारी अधिकारी श्री. प्रविण काळुखे,सहाय्यक पोलीस निरीक्षक, अंमलदार शाम लोहोमकर,सतीश मोरे तानाजी सागर यांनी केली आहे. पुढील तपास अनिता हिवरकर, पोलीस निरीक्षक(गुन्हे), बिबवेवाडी पोलीस ठाणे,पुणे या करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.