Cyber crime : ऑनलाइन फसवणूक झालेल्या मुलीचे 45 हजार रुपये परत करण्यास सायबर क्राईम ला येईल

पुणे येथील एका मुलीने ऑनलाइन शॉपिंग केले होते तिला एक लिंक शॉपिंग वाल्याने पाठवून त्या लिंक द्वारे सायबर चोरट्याने ( Cyber crime ) 55 हजार रुपये तिच्या खात्यावरून काढून तिची फसवणूक केली होती.
सदरच्या घटनेबाबत शिवाजीनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की त्यांच्याकडे एका मुलीने आपली ऑनलाईन फसवणूक होऊन तिच्या खात्यावरून 55 हजार रुपये सायबर चोरट्याने ( Cyber crime ) काढून घेतली याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी तपास करून 55 हजार रुपये पैकी 45 हजार रुपये सदरच्या मुलीला मिळवून दिले असून अजून राहिलेली अमाऊंट बाबत सायबर पोलीस पाठपुरावा करीत आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले की सदर मुलीने ऑनलाईन पार्सल खरेदी केली होती तिला पार्सल देण्याकरिता सायबर चोरट्याने ( Cyber crime ) तिला एक फिशी लिंक पाठवली होती. सदर लिंक लागली केल्यानंतर तिचा मोबाईल संपूर्ण डाटा सायबर चोरट्याला पोचला व त्याने फसवणूक केली होती.व सायबर चोरट्याने यूपीआय ट्रांजेक्शन द्वारे मुलीच्या अकाउंट मधून 55 हजार रुपये काढून घेतले होते.
याबाबत पोलिसांनी वेगवेगळ्या बँकेची माहिती गोळा करून तक्रार मुलीचे 45 हजार रुपये मिळवून दिले आहेत. व उर्वरित पैशासाठी ते प्रयत्न करीत आहेत. आता सध्या दिवाळीचे सण येत असून नागरिकांच्या अशी फसवणूक होण्याची शक्यता जास्त आहे. त्यांनी खबरदारी म्हणून अनोळखी अनधिकृत लिंक वर क्लिक करू नये. सायबर तक्रार. http:// cybercrime.gov.in या पोर्टलवर व हेल्पलाईन नंबर १९३० वर तत्काळ तक्रार नोंदवावी असे आव्हान पुणे शहर पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून पुणेकर नागरिकांच्या सायबर तक्रारी संदर्भात न्याय मिळवण्याकरता प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. पुणेकर नागरिकांनी याची कृपा करून नोंद घ्यावी.
सदरची ही कारवाई परिमंडळ एकचे पोलीस आयुक्त श्रीमती प्रियंका नारनवरे व सह पोलीस आयुक्त विश्रामबाग विभागाचे रमाकांत माने शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने. पोलीस निरीक्षक गुन्हे गौड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक . पोलीस अंमलदार गणपत वाल कोळी आदेश चलवादी. तुकाराम म्हस्के. महिला पोलीस अमलदार रुचिका जमदाडे यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.