Cyber team of shivajinagar : नागरीकांचे हरवलेले 2.50 लाख रुपये किंचे 20 मोबईल फोन विविध राज्यातुन हस्तगत करुन तक्रारदार यांना परतकरण्यात शिवाजीनगर पो स्टे चे सायबर पथकास यश

मा. अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त,पुणे शहर व मा.संदीप कर्णिक,सह पोलीस आयुक्त यांचे संकल्पनेतुन पुणेकरांच्या सायबर तक्रारी संदर्भात योग्य ती दखल घेण्याकरीता प्रत्येक पोलीस ठाणेस वेगळा सायबर कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
त्या अनुशंगाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सायबर कक्षाचे सहा.पो.निरी.बाजीराव नाईक, पोलीस अंमलदार,आदेश चलवादी, महिला पोलीस अंमलदार,रुचिका जमदाडे यंानी शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत हरवलेल्या मोबाईलचा डेटा तयार करुन,त्याबाबत तांञिक तपास करुन / त्याचा वारंवार पाठपुरावा करुन नागरीकांचे हरवलेले मोबाईल फोन हे गुजरात,उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रातील विविध ठिकाणी वापरत असल्याचे निदर्शनास आले. सदरचे मोबाईल फोन वापरकत्र्याशी तसेच संबधीत पोलीस ठाणेस कन्नड, तेलगु, हिंदी व मराठी अशा विविध भाषांमध्ये संवाद साधुन हरवलेले एकुण 2.50 लाख रु किचे 20 मोबाईल फोेन हस्तगत करण्यात यश मिळाले आहे. हस्तगत करण्यात आलेले मोबाईल फोन संबधीत तक्रारदार यांना परत मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त करुन पुणे शहर पोलीसांचे आभार व्यक्त केले आहेत.
मोबाईल हरवल्याची तक्रार तात्काळ ऑनलाईन पुणे पोलीसांचे वेबसाईटला तसेच शासनाचे Central Equipment Identity Register (CEIR)) या पोर्टलवर नोंद करावी असे आवाहन पुणे शहर पोलिसांमार्फत करण्यात येत आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा.राजेंद्र डहाळे,अपर पोलीस आयुक्त,पश्चिम प्रादेशिक विभाग,पुणे शहर, डॉ.प्रियंका नारनवरे,पोलीस उप-आयुक्त,परिमंडळ-1 व मा.सतिश गोवेकर, सहा.पोलीस आयुक्त,फरासखाना विभाग,(अतिरिक्त कार्यभार,विश्रामबाग विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,रविंद माने, पोलीस निरीक्षक,(गुन्हे),विक्रम गौड, सहा.पो.निरी.बाजीराव नाईक, सहा.पो.निरी.भोलेनाथ अहीवळे, पोलीस अंमलदार,अविनाश भिवरे, बशीर सय्यद, रुपेश वाघमारे, रणजित फडतरे, गणपत वाल कोळी, आदेश चलवादी,तुकाराम म्हस्के, महिला पोलीस अंमलदार, रुचिका जमदाडे यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.