Pune railway junction : पुणे रेल्वे जंक्शन वर प्रवाशांची तुफान गर्दीत ट्रेनमध्ये चढणाऱ्या प्रवाशाचा चेंगराचेंगरीत मुत्यू

दीपावलीच्या सणानिमित्त आपल्या गावी जाणाऱ्या एका प्रवाशाचा पुणे ते दानापूर एक्सप्रेस क्रमांक १२१४९ ही ट्रेन पुण्यावरून बिहार कडे जाणारी असून ट्रेन प्लॅटफॉर्मवर उभी होती त्यावेळी प्रवाशांची जागा पकडण्यासाठी तुफान गर्दी उसळली त्यामध्येच एका प्रवासाचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे ते दानापूर एक्सप्रेस ट्रेन क्रमांक १२१४९ ही ट्रेन पुणे जंक्शन वरून २२ ऑक्टोबर रात्री ८ वाजून ५५ मिनिटांनी बिहार कडे जाण्यासाठी सुटणार होती. सदरची ट्रेन ही प्लॅटफॉर्मवर आली असता जनरल बोगी मध्ये जागा पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर एकच गर्दी उसळली. त्यावेळी एक प्रवासी जागा पकडण्यासाठी सदरच्या गर्दीत घुसला असता. झालेल्या चेंगराचेंगरीत प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. दीपावली सणानिमित्त पुणे शहरात रोजगारासाठी आलेल्या नागरिकांनी सणानिमित्त गावी जात असताना पुणे रेल्वे जंक्शन वर तुफान अशी गर्दी झाली आहे.
या गर्दीला आवर घालण्यासाठी रेल्वे रेल्वे प्रशासनाकडून कोणतीच काळजी घेतली जात नाही. तसेच जनरल बोगींच्या जादा बोग्या जोडल्या जात नाही. ठराविकच जनरल बोग्या असल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गर्दी असते त्यातच जागा पकडण्यासाठी प्रवासी हे धावपळ करतात. त्यामुळे चंगरा चंगरी सारख्या दुर्घटना होऊन प्रवाशांना आपली प्राण मुकावा लागत आहे. दरम्यान दीपावली सणानिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशाचा या चंगरा चंगरीत मुत्यू झाल्याने अनेक प्रवाशांनी हळहळ व्यक्त केली आहे. आता तरी इथून पुढे रेल्वे प्रशासनाने ट्रेनच्या जनरल बोगीच्या संख्येत वार करावी अशी परराज्यात दीपावलीच्या सणासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांनी मागणी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.