आंध्र प्रदेश मधील रेल्वे ट्रेन अपघात मानवी चुकांमुळे झाल्याची शक्यता : आंध्र प्रदेश मध्ये दोन रेल्वे पॅसेंजर ट्रेनच्या भीषण टक्कर मध्ये मृतांचा आकडा पोहोचला १४ वर अजूनही बचावकार्य सुरूच

पुणे दिनांक ३०ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आंध्र प्रदेशातील विझियानगरम जिल्ह्यात काल रविवारी दोन रेल्वे ट्रेनचा भीषण अपघात झाला असून सदरचा अपघात हा मानवी चुकांमुळे झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या रेल्वे अपघातात १४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.अजून देखील शोध कार्य व बचावकार्य सुरू आहे.रात्रीचा वेळ असल्या मुळे शोध कार्यात अडथळा निर्माण होत होता.आता सकाळ पासून पून्हा सुरू केले आहे.यात मृत्यूचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून सांगण्यात आले की.आंध्र प्रदेश मधील विझियानगरम जिल्ह्यातील अलमांडा -कंकटापल्लीजवळ रविवारी रात्रीच्या सुमारास एका पॅसेंजरची दुसऱ्या पॅसेंजर ट्रेनला जोरात धडक दिली होती.यात विशाखापट्टणम ते पलासा या पॅसेंजर ट्रेनला विझियानगरम ते रायगड ट्रेन यांची एकाच ट्रॅकवर आल्यांने भीषण अपघात झाला व यात एक ट्रेन ही रुळावरून घसरली व ३ते ४ डबे उलटले सदर अपघाताची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळताच घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य करण्यास सुरुवात केली.यात रेल्वेचे संबंधित अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. आंध्र प्रदेश मधील या रेल्वे अपघाता नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी रेल्वे मंत्री अश्र्विनी वैष्णव यांनी रेल्वे अपघाता नंतर दुःख व्यक्त केले आहे.पंतप्रधान फंडातून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत तर जखमी झालेल्या प्रवाशांना ५०हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान आंध्र प्रदेश सरकारने देखील यातील मृतांच्या नातेवाईकांना व जखमींना तातडीने मदतीची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.