देशविरोधी घोषणा : " दिल्ली बनेगा खलिस्तान" G20 आधी दिल्ली मधील मेट्रो स्टेशनच्या भिंतीवर लिहिल्या देशविरोधी घोषणा

पुणे दिनांक २७ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) दिल्लीत सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या G20 संमेलनाआधीच शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहेत.दिल्लीमध्ये पोलिसांचा प्रचंड प्रमाणावर पोलिस बंदोबस्त असतानाही दिल्लीतील अनेक मेट्रो स्टेशनवरील भिंतीवर खलिस्तानी समर्थकांनी देशविरोधी घोषणा लिहिल्या आहेत.दहशतवादी संघटना ' सिख फाॅर जस्टिस ' चा या प्रकरणांत हात असल्याची माहिती सूत्रांनुसार मिळत आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील पाचहून अधिक मेट्रो स्टेशनच्या ' दिल्ली खलिस्तान होईल ', खलिस्तान जिंदाबाद ' अशा देशविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या.तसेच मेट्रो स्टेशनच्या बाहेरच्या भिंतीवर पंजाब हिंदुस्थानचा भाग नाही.व दिल्ली हिंदुस्थानचा ठबाग नाही असेही लिहिण्यात आले आहे.
दरम्यान खलिस्तान समर्थकांनी दिल्ली मधील शिवाजी मार्क.मादीपूर.पश्चिम विहार.उदयोग नगर.महाराजा सूरजमल स्टेडियम.गव्हर्नमेंट सर्वोद्य बाल विद्यालय नांगलोई.पंजाबी बाग व नांगलोई मेट्रो स्टेशनवर या घोषणा लिहिल्या आहेत.याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या लिहिण्यात आलेल्या घोषणा पुसून टाकल्या याप्रकरणी मेट्रो पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.व दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेवाही सक्रिय झाला आहे.व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.