मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडी करणार चौकशी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीचे समन्स.चौकशीला हजर हजर राहण्याचे आदेश

पुणे दिनांक ३१ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आम आदमी पक्षाचे अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीच्या वतीने समन्स बजावण्यात आले आहे.व २ नोव्हेंबर रोजी ईडीने केजरीवाल यांना चौकशी साठी हजर राहण्यास सांगितले आहे.दिल्लीतील मद्यविक्री घोटाळा प्रकरणात ईडीच्या वतीने हे समन्स बजावण्यात आले आहे.यापूर्वी देखील सीबीआय व केंद्रीय तपास यंत्रणेने केजरीवाल यांची चौकशी केली होती.
दरम्यान दिल्लीतील अबकारी धोरण व मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने चौकशी सुरू केली आहे.काही महिन्यांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे.त्या नंतर खासदार संजय सिंह यांना देखील ईडीने अटक केली आहे.आता ईडीने केजरीवाल यांना देखील चौकशी साठी हजर राहण्यास सांगितले आहे.दरम्यान अरविंद केजरीवाल यांना ईडीने नोटीस बजावल्या नंतर आम आदमी पार्टीचे नेते सौरभ भारद्वाज यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.कोणत्याही परिस्थितीत आम आदमी पक्षाला संपवणे हेच केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे.अरविंद केजरीवाल यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्यांना भाजपचा तुरुंगात पाठवण्याचा प्रयत्न आहे.असा गंभीर आरोप सौरभ भारद्वाज यांनी यावेळी केला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.