Delhi Kanjhwala incident update : दिल्ली पोलिसांचा मोठा खुलासा, अंजलीची मैत्रिण निधीचे ड्रग्ज कनेक्शन, आग्रा येथे गांज्यासह पकडले

कांजवाला प्रकरणात साक्षीदार म्हणून पुढे आलेल्या निधी, अंजलीच्या मैत्रिणीचे विधान कोणालाच पचनी पडत नाही. निधीने दावा केला होता की, अंजली दारूच्या नशेत स्कूटी चालवत होती, मात्र शवविच्छेदनात अंजलीने दारूचे सेवन केले नसल्याचे स्पष्ट झाले. पोस्टमार्टमच्या वेळी अंजलीच्या पोटात दारू नव्हती. आता पोलीसही या प्रकरणाचा तपास पुढे नेत सर्व पैलू तपासत आहेत. अंजलीच्या मृत्यूच्या गूढतेमध्ये, जेव्हा पोलिसांनी निधीची चौकशी केली तेव्हा त्यांना असे आढळून आले की निधीचा एका ड्रग्ज टोळीशी संबंध आहे आणि दोन वर्षांपूर्वी ती गांजासह पकडली गेली होती. निधी 2020 मध्ये आग्रा येथे 10 किलो गांजासह पकडली गेली होती. जीआरपीने त्याच्यासोबत दोन तरुणांनाही रेल्वे स्टेशनवरून पकडले होते. त्यावेळी निधीकडे 10-10 किलो गांजा सापडला.तुरुंगात जाण्यापूर्वी तिघांनी तेलंगणातून दिल्लीला गांजा घेऊन जात असल्याचे पोलिसांना सांगितले. दोन वर्षांतही गांजा मागवणाऱ्या तरुणाचा शोध पोलिसांना लावता आलेला नाही. हे प्रकरण समोर आल्यानंतर निधीही चौकशीच्या फेऱ्यात आहे. लिंक टू लिंक स्थापित करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी निधीला गुन्ह्याच्या ठिकाणी नेले आणि तिला त्या हॉटेलमध्येही नेले जिथून निधी आणि अंजली स्कूटीवरून निघाले होते.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.