नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी.लोह खाण उत्खनन प्रकरण : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गटातील मंत्र्याला जीवे ठार मारण्याची धमकी!

पुणे दिनांक २० सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते व अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांकडून जीवे ठार मारण्यांची धमकी पत्राद्वारे मिळाली आहे.आता प्रर्यत मिळालेली वर्षाभरातील ही तिसरी धमकी आत्राम यांना मिळालेली आहे.याबाबत त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून या प्रकरणी माहिती दिली आहे.धमकीच्या पत्रा प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार आत्राम यांना मिळालेल्या पत्रात धमकी देण्यात आली आहे की.सुरजागड येथील सुरू असलेल्या लोह खाणीतील उत्खनन तातडीने थांबवा नाही तर त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल.यापत्रात जावाई व भाऊ व कंपनी मध्ये काम करणाऱ्या कामगारांची नावे देखील आहेत.गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे लोंखंडाच्या खाणींचे सध्या मोठ्या प्रमाणावर उत्खनन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.याला नक्षलवादी संघटनांचा मोठ्या प्रमाणावर विरोध आहे.व त्यातूनच त्यांना धमकी देण्यात आली आहे.दरम्यान धमकी नंतर आत्राम यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.