युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यात दाखवले काळे झेंडे

पुणे दिनांक ९ नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुणे दौऱ्यावर आले आहेत.दरम्यान पुण्यात त्यांचा ताफा जात असताना युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आहे.
दरम्यान पुण्यात पुणे विद्यापीठात दोन संघटनांमध्ये झालेली हाणामारी.तसेच महाराष्ट्रात सर्वत्र मराठा आरक्षण बाबत चाललं साखळी उपोषण शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी येरवडा कारागृहात घेऊन जाणऱ्या आरोपींना पोलिस बंदोबस्तात व्हाॅन अडवून कैद्यांना वाटण्यात आलेली पाकिटे.याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून खळबळ उडवून दिली व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बघा बघा पोलिस गाडी आली असं म्हणलं आहे.व यांची सखोल चौकशी करून पोलिसांवर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे.पुण्यात ड्रग्जचे साठे मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.या सर्व गोष्टींकडे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांना आज रोडवरून जाणाऱ्या गृहमंत्री यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले आहे.या प्ररकणी पोलिसांनी काॅग्रेसच्या कार्यकर्ते यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.